• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर

जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना कोणती खाते मिळाली? पहा..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 21, 2024
in राजकीय
0
राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर

नागपूर, (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात खाते वाटपाची वाट पाहत असलेल्या मंत्र्यांना आज अखेर सायंकाळी राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व उर्जा खात्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले असून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे. तर महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी दिली आहे.

जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी तीन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. यात गिरीश महाजन यांना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण) व आपत्ती व्यवस्थापन खाते मिळाले आहे. गुलाबराव पाटील यांना पूर्वीचेच पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी मिळाली आहे. तर संजय सावकारे यांना वस्त्र उद्योग खाते मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्यात तीनही कॅबिनेट मंत्री असल्याने आता पालकमंत्री पद नेमकं कुणाला मिळत, याकडे जळगाव जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.

कॅबिनेट मंत्री.
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
गणेश नाईक –  वन
दादाजी भुसे – शालेय शिक्षण
संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
अदिती तटकरे – महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे – कृषी
जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – वस्त्र उद्योग
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – वाहतूक
भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers)
माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम  – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण

 


 

Next Post
जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र..  – एस. एस. म्हस्के

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र..  - एस. एस. म्हस्के

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add