जळगाव, दि. ११ – शहराच्या विविध विकासासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात उप सचिव श्रीकांत आंडगे यांनी शासन निर्णय आज जारी केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनी ६ एप्रिल २०२३ रोजी नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
यानुसार नगरविकास विभागाने आज मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
▪️या निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत लेक रेसिडेन्सी ते गणेश घाटापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ५० लक्ष.
▪️प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत गट नं. ४१४ कंपाऊंड च्या आतील मुख्य रस्ता व इतर लहान ५ रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ६० लक्ष.
▪️प्रभाग क्र. ०६ व १६ अंतर्गत रुख्मा टेंट हाउस ते सुपारी कारखाना व गणेश अपार्टमेंट ते पार्श्वनाथ प्लास्टिक पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे २१० लक्ष.
▪️ प्रभाग क्र.०६ अंतर्गत रामदेव बाबा मंदिर ते लिटल स्टेप प्ले स्कुल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३८.२५ लक्ष.
प्रभाग क्र.०७ अंतर्गत अक्झॉन ब्रेन हॉस्पिटल पासून ते श्री. प्रमोद बसेर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ६७.२५ लक्ष,
▪️प्रभाग क्र.१२ अंतर्गत श्री. टोके यांच्या घरापासून ते श्री. झवर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ३२.५० लक्ष,
▪️प्रभाग क्र.११ अंतर्गत रामानंद नगर रिक्षा स्टॉप पासून ते श्री. अत्तरदे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे २२ लक्ष.
▪️प्रभाग क्र. १३ अंतर्गत श्री. डोंगरे यांच्या घरापासून ते श्री. अमोल चौधरी यांच्या घरापर्यंत ते श्री.सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे २० लक्ष असे एकूण ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, हे काम सार्वजानिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.