• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सत्ता मिळविणे हाच मविआचा विचार.. – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 11, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
सत्ता मिळविणे हाच मविआचा विचार.. – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव, दि.११ –  महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष देशाच्या विकासासाठी किंवा राष्ट्रप्रथम या विचाराने एकत्र आलेले नाहीत, तर त्यांचा एकमेव हेतू केवळ सत्ता मिळविणे हाच आहे. त्यामुळे वज्रमूठ जाड झाली की सैल झाली याने कोणताही फरक पडत नाही, जनता सगळे ओळखून आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्हा संघटनात्मक प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणावरून टीका केली. ते सत्तेत व आम्ही विरोधी पक्षात असताना महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रयत्न करीत होतो. सरकारला योग्य सूचना देणे, सरकारला मदत करणे. आता केवळ सकाळी उठून टीका केली जाते.

एकनाथ खडसे हे भाजपात परत येण्याविषयी माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेले नाहीत. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांनी भाजपासाठी मोठे काम केले आहे असेही बावनकुळे म्हणाले.

कॉंग्रेसने मुस्लिमांत संभ्रम पसरविला..
कॉंग्रेसने केवळ मतांच्या राजकारणासाठी निवडणुकीच्या काळात संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविले. भारतातील मुस्लिमांची स्थिती जगात सर्वांत चांगली आहे. भारतावर प्रेम करणारा मुस्लिम कधीच बाबर, अकबर, औरंगेजबाची जयंती साजरी करीत नाही. मुस्लिमांमध्ये संभ्रम पसरविण्यात काही राजकारणी कारणीभूत आहेत. मुस्लिम समाजाला शिक्षण, आरोग्य रोजगार हवा आहे. तो मिळावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे.

शेवटी काळच उत्तर देईल !
उद्धव ठाकरे व शिवसेनेचे लोक माझ्या कुळाबद्दल बोलतात, माझे कुळ काढतात, माझ्या वर्णाबद्दल बोलतात, माझा चेहरा आफ्रीकन असल्याबद्दल बोलतात. आज उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यांच्या खिजगतीतही नाही. याची उत्तरे शेवटी काळ- वेळ ठरवेल.

Next Post
आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने शहरातील विविध रस्ते विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने शहरातील विविध रस्ते विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

August 28, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘इको क्लब’ ठरतोय पर्यावरणाचा श्री गणेश!

August 27, 2025
दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला
खान्देश

दुर्दैवी अपघात: ओव्हरटेकच्या प्रयत्नात रिक्षाने चिमुकलीचा जीव घेतला

August 27, 2025
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार निवारण सेवा

August 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group