• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर दणदणीत विजय

एक डाव व १८६ धावांनी मारली बाजी, तीन सामन्यात १६ गुणांची कमाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 17, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर दणदणीत विजय

जळगांव, दि.१७ – येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे, काल व आज जळगाव संघाचा साखळी सामना परभणी यांच्या दरम्यान खेळण्यात आला. सामन्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्या हस्ते करण्यात आली.

नाणेफेक जळगाव संघाने जिंकून परभणी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधारचा निर्णय योग्य ठरवीत जळगाव गोलंदाजांनी परभणी संघाला ३५.२ षटकात केवळ १२१ धावात बाद केले. त्यात सम्राट राज ४० सौरभ शिंदेने १८ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव संघातर्फे जेसल पटेल ५, सौरभ सिंग ३ आणि ऋषभ कारवा यांनी २ गडी बाद केले प्रतिउत्तरात जळगांव संघाने आपले पहिला डाव ६७ षटकात ७ गडी बाद ३८२ धावावर घोषीत केला आणि २६१ धावांची महत्वपूर्ण अशी विजयी आघाडी घेतली त्यात कर्णधार वरुण देशपांडे याने शतकी खेळी करून १३१ धावा केल्या त्याला साथ देत निरज जोशी ८० आणि कुणाल फालक नाबाद ७५ धावा केल्या.

गोलंदाजीत परभणी संघा तर्फे शुभम कटारे २ मोहंमद युसूफ, सतीश बिराजदार आणि ओंकार मोहीते यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. परभणी संघ २६१ धावांनी पिछाडीवर पडला व त्यांचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात ७५ धावात गारद झाला त्यात पुरुषोत्तम खांडेभरद १७, सौरभ शिंदे १५ आणि एलिझा १३ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव तर्फे राहुल निंभोरे ४ सौरभ सिंग यांनी २ गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव आणि १८६ धावांनी जिंकला व बोनस गुणासहित ७ गुण प्राप्त केले. ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व घनःश्याम चौधरी आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पहिले. विजयी संघाचे जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले.

Next Post
असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

असाध्य आजारांपासून बचावासाठी वनस्पती आधारित आहार महत्वाचे : डॉ. झिशान अली

ताज्या बातम्या

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
आरोग्य

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आरोग्य

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

आर. के. पाटील यांच्या प्रदीर्घ सेवेचा जळगावात गौरव; सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न

July 1, 2026
जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group