जळगाव, दि.१४ – मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनतर्फे भारतरत्न मौलाना आजाद आदर्श पुरस्कार सन २०२२-२३ चे वितरण शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या अल्पबचत भवन येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ सायन्स येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. प्रिती पाटील-महाजन यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, करीम सालार, जमील देशपांडे, अध्यक्ष फिरोज शेख, जिल्हा बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रिती पाटील-महाजन डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ सायन्स जळगांव येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथपालाचे कार्य ते सांभाळतात वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना योग्य पुस्तकांपर्यंत पोहोचविणे व त्यांना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व समाजाप्रती त्यांचे कर्तव्य, नैतिकता यांची जाणीव पुस्तकांच्या वाचनाच्या माध्यमातुन करुन देणे या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे.
या पूर्वीही प्रा. प्रिती महाजन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. प्रिती पाटील महाजन या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल २०१९ मध्ये त्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तर ८ मार्च २०२१ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा युवती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि यंदाच्या पुरस्काराने त्याच्या सन्मानात आणखी भर पडली आहे.