• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ.निर्मल बाबू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 17, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा
0
हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ.निर्मल बाबू

जळगाव, दि.१६ – औषधी व प्रसाधन उद्योगांमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे. कोरोनासारख्या काळात घसा, खोकला, कफसाठी हळद सह अन्य मसाल्यांची पदार्थ गुणकारी ठरल्याचे आपण बघितले आहेच. महाराष्ट्रातील जमिनीचा पोत पाहिला असता बेड पद्धत आणि जैन ठिबकसह, काटेकोर पाणी व खतं व्यवस्थापनातून सेलम सह अन्य लोकप्रिय हळदीच्या वाणांचे उत्पादन घेता येऊ शकते. हमी भावाच्या करार शेतीतून प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळेल असा विश्वास केरळच्या आयसीएआर आयआयएसआरचे स्पाईस संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू यांनी व्यक्त केला.

जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त डॉ. निर्मल बाबू शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन प्रात्यक्षिक विभागाचे संजय सोनजे यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन प्रात्यक्षिक विकास केंद्रावर देशभरातील १९ हळदीच्या जातींचे उत्पादन घेण्यात आले.

यामध्ये कान्हदेशातील लोकप्रिय सेलम यासह मेघा, राजेंद्र सोनाली, राजेंद्र सोनीया, पितांबर, सिक्कीम लोकल यांचा समावेश आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन या आरोग्यादृष्ट्या महत्त्वाचा गुणधर्म असलेला घटक असतो. त्याचे प्रमाण कान्हदेशातील जास्त प्रमाणात लावली जाणारी व्हरायटी सेलम यात दिसतो. जैन हिल्स वरील संशोधन प्रात्यक्षिक केंद्रामध्ये बेड, वाफसा पद्धत, मल्चिंगचा वापर, यासह दोन ड्रीप लाईन द्वारे सिंचन दिले गेले. यातून योग्य वेळी पाण्याचा ताण देऊन फर्टिगेशन यंत्रणेद्वारे खते देता आली. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी जवळपास एकरी प्रति २२ ते २३ टन उत्पादन घेतल्याचे डॉ. निर्मला बाबू म्हणाले.

स्मृती भ्रंश, कर्करोगसह अन्य आजारांवर हळद गुणकारी असल्याचे अनेक निष्कर्य समोर आले आहेत. यासह अन्य महत्त्वांमुळे हळद सह मसाल्यांची अन्य पिकाला जागतीक मागणी वाढत आहे. असे असताना जैन इरिगेशनच्या पांढरा कांदा करार शेतीच्या धर्तीवर करार शेती करून उत्पन्न घेऊन महाराष्ट्र मुख्य पुरवठादार म्हणून आणखी पुढे येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करीत कीड नियंत्रणासह अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळून, हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहनही यावेळी डॉ. निर्मला बाबू यांनी केले.

Next Post
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित रंगभरण स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित रंगभरण स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add