जळगाव,दि. १८ – सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समतीच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शनिवारी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. इयत्ता १ ते ९ वीच्या ८७०० विद्यार्थ्यांनी या चित्र रंगभरण स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. या स्पर्धेला कलाध्यापक संघ व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धा पहिला गट १ ते २, दुसरा गट ३ ते ४ थी, तिसरा गट ५ ते ७ वी, चौथा गट ८ ते ९ असे होते. या स्पर्धेचा निकाल – पहिला गट – प्रथम क्रमांक तन्मयी गणेश वार्डे, द्वितीय रिद्धी चोपडा, तृतीय – पुर्वश्री चव्हाण, दुस-या गटात प्रथम दिव्यश्री बोरसे, द्वितीय – हर्षीका कळस्कर, तृतीय – पुष्कर चौधरी, तिस-या गटात प्रथम क्रमांक वैभवी पाटील, द्वितीय क्रमांक द्रोणाली पाटील, तृतीय क्रमांक मारिया फातेमा जाविद शेख तर चौथ्या गटात प्रथम क्रमांक आदित्य सोनार, निकिता महाजन, तृतिय क्रमांक नमिता वर्मा यांना पारितोषिके जाहिर करण्यात आलीत. यासोबतच प्रत्येक गटात तीन तीन उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात आलीत.
पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जे. के. चव्हाण, लिना पवार, शंभू पाटील, चित्रकार शालिग्राम भिरूड, पुरूषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, राम पवार, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य आदी उपस्थित होते. स्पर्धेप्रसंगी एन.ओ.चौधरी, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे, अरूण सपकाळे, एस.एस. वाणी, निरंजन शेलार, विजय जैन, हर्षल तळेले, अजय पाटील, सुनील दाभाडे आदी चित्रकार उपस्थित होते. सुत्रसंचालन अविनाश बाविस्कर यांना केले.
स्पर्धेची वैशिष्ट्ये..
संपूर्ण गांधी उद्यान विद्यार्थ्यांनी भरून गेले होते. शिवरायांच्या जयघोषाने उद्यान दुमदुमले उर्दु माध्यमांच्या विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध शाळातील विद्यार्थी व कलाशिक्षक सहभागी झाले. स्पर्धेनंतर तत्काळ निकाल जाहिर करण्यात आला. संपूर्ण उत्स्फुर्थ सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला.
रविवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन..
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रविवारी सकाळी ८ वा स्टेडियम पासून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षा साधना महाजन व सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील मान्यवर तसेच विविध शाळांतील विद्यार्थी शिवरायांच्या जिवनावर आधारित सजीव देखावे, चित्ररथ अशा विविध माध्यमातून ही देखणी मिरवणुक निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीची समाप्ती केली जाणार आहे. नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे समन्वयक शंभु पाटील यांनी केले आहे.