• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आधी मुलीला दिला गळफास नंतर आईने केली आत्महत्या !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 24, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आधी मुलीला दिला गळफास नंतर आईने केली आत्महत्या !

जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील हरीविठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ८ वर्षीय चिमुकलीला गळफास दिला नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई व मुलीचे नाव आहे. त्यांचे पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, हरिविठ्ठल नगर भागात तीन मजली इमारतीत ते इतर दोन भावांसह वास्तव्याला आहेत. दीपक दाभाडे हे आज दि.२४ रोजी भावांसह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ येथे गेलेले होते.

त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी सकाळी साधारण ९ वाजेनंतर मुलीला एका स्कार्फने गळफास दिला नंतर स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली. दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांचे अवसान गळून त्यांनी एकच हंबरडा फोडला.

नातेवाईकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
आ. राजूमामा भोळे यांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा

आ. राजूमामा भोळे यांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group