• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगाव अतीवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी अध्यादेश काढा

खासदार उन्मेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 1, 2021
in जळगाव जिल्हा
0
चाळीसगाव अतीवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी अध्यादेश काढा

चाळीसगाव, दि. 01- तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो पशुधन मृत्युमुखी पडले तर हजारो एकर शेती,शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले असून, शहरातील नदी किनाऱ्यावरील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. व्यापाऱ्यांचे दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शहरातील पुराची भीषणता अधोरेखित होत आहे. ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे, तर अनेक गावांमधून येण्याजाण्यास मार्ग नाही. पुलांवरून पाणी वाहत आहे.

अशा परिस्थितीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून मुख्यमंत्री महोदयांनी कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतीवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी अध्यादेश काढावा. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अनेक गावे बाधित

चाळीसगाव तालुक्यातील वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, लोंजे, बाणगाव, सर्वाधिक बाधित रोकडे या डोंगर पट्ट्यातील गावात पाण्याने हाहाकार झाला आहे. शेकडो पशूधन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले तर अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहे. शेतांमध्ये पाणी घुसल्याने हजारो एकर शेती जमिनीला नुकसान झाले आहे. शेतांचे बांध वाहून गेले तसेच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच दयानंद जवळील मेजरनाना कॉम्पलेक्स मध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शिवाजीघाट ते शनिमंदिर या परिसरातील दुकानदारांना या पर्जन्यवृष्टीने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

कन्नड घाटात इतिहासात पहिल्यांदाच ठिकठिकाणी कोसळल्या दरडी

कन्नड घाटात ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक वाहनधारक अडकल्याने सकाळपासूनच तेथे मदतकार्य सुरू झाले होते. वाहनचालक,मालक तसेच घाटातील प्रवाश्यांनी व घाटाखालील हॉटेल व्यावसायिकांनी घाटात जागोजागी दरडी कोसळल्याची माहिती दिली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळावर राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले.

राज्य सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे

चाळीसगाव, पाचोरा, भडगाव यांचेसह जिल्हातील अनेक गावांना या पर्जन्यवृष्टीचा फटका बसला आहे. रोकडे गावात पाण्याचा प्रवाह गावात शिरल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, बाणगाव लोंजे या परिसराचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.नुकसानीमुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाला आहे. कोकणच्या पूरग्रस्तांना ज्याप्रमाणे राज्याने अध्यादेश काढून भरीव मदत केली त्या कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील अतीवृष्टीबाधितांच्या मदतीचा अध्यादेश काढावा अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.


 

Next Post
“नली” एकलनाट्याचा आज ऑनलाइन प्रयोग

"नली" एकलनाट्याचा आज ऑनलाइन प्रयोग

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य
खान्देश

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला; मंत्रालयात रंगणार ‘आरक्षण’ नाट्य

January 19, 2026
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group