• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. अनिल पाटीलांच्या पुढाकारातून आयोजित क्रिकेट स्पर्धेत पार्थ टेक्स संघाने पटकावला आमदार चषक

पुढील वर्षी दोन लाखाचे प्रथम बक्षिस देण्याची घोषणा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 7, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
आ. अनिल पाटीलांच्या पुढाकारातून आयोजित क्रिकेट स्पर्धेत पार्थ टेक्स संघाने पटकावला आमदार चषक

अमळनेर, दि. ०७ – खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधत आ. अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने अमळनेर येथे राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत गुजरात राज्यातील पार्थ टेक्स, सुरत या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवुन आमदार चषक पटकावला. तर प्रतिस्पर्धी एमसीए मालेगांव संघ उपविजेता ठरला.

अंतिम सामना सुरु होण्या आधी आमदारांनी स्वतः फलंदाजी करुन आनंद घेतला. विजेता संघाला १ लाख ११ हजार रुपयांचे प्रथम पारीतोषीक व आमदार चषक तर उपविजेता संघाला ५५ हजार ५५५ रुपयांचे पारीतोषीक व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती. तरुणाईनेप जल्लोष करत सामन्याचा आनंद घेतला. आ. पाटील स्वतः पुर्ण सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.

शहरातील प्रतिष्ठीत मंडळी देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले होते. यानंतर बक्षिस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदारांसह खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ.शरद बाविस्कर, मुन्ना शर्मा, विक्रांत पाटील, पांडुरंग महाजन, राजु फाफोरेकर, प्रविण जैन, नरेंद्र चौधरी, सुरेश परदेशी, सचिन बाळु पाटील, अॅड. यज्ञेश्वर पाटील, बंडु जैन, ए.पी.आय विकास शिरोडे, पंकज वाणी, महेंद्र पवार, रवि पाटील उपस्थित होते.

यावेळी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. यात सानेगुरुजी शाळा विजेता तर जी.एस. हायस्कुल संघ उपविजेता ठरला. तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत मॅन ऑफ द सीरीज बादल मंगुकिया, बेस्ट बॅट्समन ट्रॉफी चिंतन देसाई, बेस्ट बॉलर ट्रॉफी सेनेले जोसेडलिया, बेस्ट किपर सिद्धेश देशमुख आदींना सन्मानित करण्यात आले.

पुढील वर्षी २ लाखाचे प्रथम बक्षिस देण्याची आ. अनिल पाटीलांची घोषणा..

आ.अनिल भाईदास पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना पुढील वर्षी प्रथम बक्षिस २ लाखांचे तर द्वितीय बक्षिस दीड लाखांचे देण्याची घोषणा केल्याने क्रिकेट प्रेमींनी आनंद व्यक्त केला. यावेळी पुढे बोलतांना आमदार म्हणाले की, सर्वच संघांनी चांगले प्रदर्शन केले. राज्यभरातील जवळपास ३२ संघ यात सहभागी झाले होते. प्रामुख्याने अमळनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अभिषेक विनोद पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली.जळगांव येथील समालोचक पद्माकर पाटील यांनी संपुर्ण स्पर्धा संपेपर्यंत थांबुन रंगत आणली. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील सामने पाहता येत असल्याने सुमारे २ लाखांपेक्षा अधीक शौकीनांनी हे सामने पाहीले. हे आमदार चषकाचे वैशिष्ट्य असुन येथूनच इंटरनॅशनल खेळाडु निर्माण झाला पाहीजे हीच आपली भावना आहे. पुढील वर्षी महिलांची देखील टुर्नामेंट भरविण्याचा आपला मानस असुन त्या सोबतच फुटबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आदी स्पर्धा घेऊन तरुणाईला मैदानी खेळाकडे वळविण्याचा व त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयत्न असेल अशी भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख अभिषेक पाटील, गुणवंत पाटील, निलेश महाजन, दत्ता वाणी, रवि पाटील, मिलींद शिंदे, मेघराज महाजन, संदीप सराफ, संजय पाटील, जितेन साळुंके, मंगेश मोरे, ग्राऊंडमन अश्विन पाटील आदींनी परिश्रम घेतले. सदर आमदार चषक स्पर्धेसाठी आमदारांसह ओमप्रकाश मुंदडा, पंकज मराठे, प्रकाश अमृतकर, स्वादिष्ट नमकीनचे निलेश पाटील, कुसुमाई ग्रुपचे महेंद्र पवार, सुर्या बॅटरीचे नरेंद्र चौधरी, डॉ. अनिल शिंदे, भरत ललवाणी, डॉ. शरद बाविस्कर, भावेश जैन, गौरव पाटील आदींनी आर्थीक सहकार्य केले.

 

 


Next Post
‘साली नंबर वन’ या अहिराणी गीताचा गायक नवल माळी यांचे निधन

'साली नंबर वन' या अहिराणी गीताचा गायक नवल माळी यांचे निधन

ताज्या बातम्या

४८ तासांत मंदिरातील दागिन्यांचे चोरटे गजाआड; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
गुन्हे

४८ तासांत मंदिरातील दागिन्यांचे चोरटे गजाआड; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

July 15, 2025
चुकीचा किडनी अहवाल देणारे चोपडा येथील डॉ. उमेश कोल्हे निलंबित
आरोग्य

चुकीचा किडनी अहवाल देणारे चोपडा येथील डॉ. उमेश कोल्हे निलंबित

July 15, 2025
नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव जिल्हा

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

July 14, 2025
जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी
जळगाव जिल्हा

जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी

July 14, 2025
टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते
जळगाव जिल्हा

टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते

July 14, 2025
मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

July 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group