जळगाव, दि.30- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले.
दरम्यान जळगावातील हनुमान मंदिर येथे भाजपा जिल्हा महानगर तर्फे शंखनाद आंदोलन करत महा आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली असून मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालायं.
देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू आहेत. यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलन करत ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान सांस्कृतिक आघाडीतर्फे विशाल जाधव आणि भावेश पाटील यांनी पोवाडा सादर केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, दिपक साखरे, प्रा जीवन अत्तरदे, रेखा कुलकर्णी, नीला चौधरी, वंदना पाटील, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, गणेश माळी, धीरज वर्मा, नगरसेविका शुचिता हाडा, दीपमाला काळे, गायत्री राणे, सुरेखा तायडे, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, रेखा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, आघाडी अध्यक्ष हेमंत जोशी, कुमार श्रीराने, जयेश भावसार, दीपक बाविस्कर, लता बाविस्कर, भूषण लाडवंजारी, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप, किसन मराठे, केदार देशपांडे, अजित राणे, अनिल जोशी, विनोद मराठे, यांच्या सह लक्ष्मण धनगर, तृप्ती पाटील, सौ शालू जाधव, मिलिंद चौधरी, महेश पाटील, विक्की सोनार, स्वामी पोतदार, अश्विन सैनदाने, सागर जाधव, प्रतीक शेठ, मयूर भोई, गौरव पाटील, भूषण पाटील, महेश लाठी, पंकज गागडे यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आंदोलनासाठी रस्त्यावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली.