जळगाव, दि.२८ – ‘महात्मा गांधीजी यांच्या ‘ग्रामस्वराज्य’ या संकल्पनेवर आम्ही काम करत गेलो गावाच्या समस्या गावातच सोडविल्या आहेत. ग्रामसभेत सर्व सहमतीने स्वराज्यच्या दिशेने प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश याप्रमाणे लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा होय यातील ग्रामसभा हीच सुप्रिम पॉवर आहे; यात महात्मा गांधी व विनोबा भावे यांची ग्राम स्वराज्याच्यादृष्टीने सत्ताविकेंद्रीकरण ही संकल्पना दिसते’ असे महत्त्वपूर्ण विचार देवाजी तोफा व्यक्त केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर देवाजी तोफा ह्यांनी दुसरे पुष्प गुंफले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, संचालक अशोक जैन यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली. त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. देवाजी तोफा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचा सुतीहार देऊन सत्कार उदय महाजन, नितीन चोपडा यांनी केला.
देवाजी तोफा यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाच्या रोचक परिवर्तनाची प्रेरक कहाणी मांडली. सरकारची योजना गावात राबविली जात नाही. कायदा कानून बनविले जातात पण त्यांचा फायदा किती मिळतो? ह्यावर अभ्यासपूर्ण अध्ययन, विचार करण्याची गरज असल्याचे मत देवाजी तोफा यांनी व्यक्त केले. ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ असा नारा देण्याची गरज आहे. यातून महात्मा गांधीजींनी दिलेल्या विचारांना आत्मसात करून त्या मार्गावर चालणे म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस होणे होय असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले.