जळगाव, दि.२२ – वंजारी महासंघातर्फे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमलेनाचे आयोजन २५ डिसेंबर रविवारी नशिक येथे करण्यात आले आहे. शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात साहित्य संमलेन होणार असून पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ असेल नंतर भोजन आणि तदनंतर कथा कथन परिसंवाद होईल. अंतिम सत्रात कवी संमेलन होईल या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून विदर्भ रत्न बाबारावजी मुसळे हे लाभले असुन प्रमुख पाहुणे म्हणून नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत जी गोडसे, गणेश खाडे, वंजारी महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक काकासाहेब खांबाळकर, जेष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ तुळशीदास महाराज गुट्टे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या मार्गदर्शक साहित्यिक तथा प्रकाशक लता गुठे, साहित्य आघाडीच्या राज्य सरचिटणीस कवयित्री सिंधुताई दहिफळे, राज्य संघटक लेखक कवयित्री सुषमा सांगळे वनवे, महिला साहित्य आघाडीच्या अध्यक्ष शितल नागरे-चोले संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तसेच या संमेलनासाठी राज्यातील ज्येष्ठ तथा नवकवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत या या अनुषंगाने ग्रामीण साहित्य स्वर्गिय सुंदराबाई मुरलीधर आंधळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार २०२२ देण्यात येणार आहे.
▪️वंजारी समाजाचे साहित्य संमेलन नवपिढीसाठी प्रेरणादायी ठरेल वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिलं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असुन हा क्षण साहित्य क्षेत्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारखा आहे आणि याचा निश्चित फायदा भविष्यातील समाज व्यवस्थेला होईल . तसेच नाथ संप्रदायातील परंपरा असणारे संत अवजीनाथ महाराज संत सद्गुरु वामनभाऊ महाराज राष्ट्र संत भगवान बाबा स्वर्गिय गोपीनाथरावज मुंडे साहेब यांच्या विचारांचा वारसा अधिक अधिक बळकट करत भविष्यातील वैचारिक मंथन आणि चिंतन होणं गरजेच आहे असं मत संमेलनाचे अध्यक्ष प्रा.वा .ना आंधळे यांनी व्यक्त केले.