लालसिंग पाटील | भडगाव – कजगाव येथील केंद्रीय मराठी मुलांची शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुंडलिक मधुकर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
सदरील निवड ही बिनविरोध करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष पुंडलिक सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि प शाळेच्या मुख्याध्यापिका तथा समितीच्या सचिव रंजना भांडारकर, विलास पाटील, देवीदास हिरे, दिनेश पाटील, आनंद साठे, लालसिंग पाटील, शिरीन खान, कविता पाटील, लताबाई पाटील, छाया महाजन, मीना खैरनार, प्रतिभा वाघ, मनीषा पाटील, पियुष पाटील, नरेश पाटील आदी उपस्थित होते.