• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या ५०० जणांची नोंदणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 19, 2022
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या ५०० जणांची नोंदणी

जळगाव, दि.१९ – जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने मद्य, गुटखा, तंबाखू सेवन करू नये त्यांचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवलेली आहे.

त्यात वेळोवेळी सहकाऱ्यांच्या विशिष्ट वयानंतर शारिरीक तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन केले जाते. शहरातील इतर आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कंपनीचे सहकारी हिरीरीने सहभागी होत असतात. अलीकडेच कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडीया यांचे ‘प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजले होते. या उपक्रमाचा जळगाव शहरातील व्यक्तींनाही लाभ घेता यावा यासाठी शहरात देखील डॉ. कापडीया यांचे हृदय रोगाविषयी व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता.

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सजगता व सामाजिक बांधिलकीने जैन इरिगेशनचे सहकाऱ्यांच्या या  खान्देश रनमध्ये सहभागी होत आहेत. गत सहा वर्षांपासून जळगाव रनर्स ग्रुपच्या पुढाकाराने ‘खान्देश रन’ आयोजित करण्यात येत आहे. जळगावकरांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो. या वर्षी ४ डिसेंबर २०२२ ला खान्देश रनचे ६ वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगावकरांच सक्रिय पाठबळ असावं.. 
▪️सर्वप्रथम कान्हदेश रनच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, निरामय आरोग्यासाठी विविध क्रियांपैकी धावणे हे एक उत्तम माध्यम आहे, नक्कीच प्रत्येकाने ही सवय अंगिकारली पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी यासाठी कान्हदेश रन च्या माध्यमातून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यावर्षी आमच्या जैन उद्योग समूहाचे जवळपास ५०० सहकारी असतील, जळगावकरांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स ली. जळगाव.

 


Next Post
सजीव श्रीकृष्ण जन्म सोहळ्याने भागवत कथेत भाविकांच्या चैतन्यात वाढ

सजीव श्रीकृष्ण जन्म सोहळ्याने भागवत कथेत भाविकांच्या चैतन्यात वाढ

ताज्या बातम्या

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !
गुन्हे

जळगावातून चोरलेल्या कार मिळाल्या राजस्थानातील वाळवंटात !

May 9, 2025
भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group