• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय भागवत कथेला प्रारंभ

हभप ज्ञानेश्वर महाराजांच्या सुश्राव्य कथा वाचनाला मेहरूण मध्ये सुरुवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय भागवत कथेला प्रारंभ

जळगाव, दि.१५ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ मेहरुण प्रभागात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी श्रीमद् भागवत कथा पूजनाने किर्तन सप्ताहाला भाविकांच्या उत्साहात प्रारंभ झाला.

येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.१५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २२ वे वर्षे आहे. हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी झाला.

श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन माजी महापौर नितीन लढ्ढा आणि माजी नगरसेविका अलका लढ्ढा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेसह प्रभागातील माजी नगरसेवक स्व. सुभद्राताई व सुरेश नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोदवड तालुक्यातील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्यासह श्रीमद् भागवत कथेतील सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व सप्ताह आयोजक प्रशांत नाईक, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांच्यासह मेहरूण परीसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संगीतमय भागवत कथेला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी सुरुवात केली. पहिल्या दिवशी भागवत कथा महात्म्य वर्णन करीत श्रीमद् भागवत कथा ही जनकल्याणकारी व भाविकांना मन:शांतीच्या मार्गावर नेणारी असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाराज यांना विणेवर निवृत्ती महाराज माळी, भास्कर महाजन, पेटीवर विठ्ठल महाराज अंभईकर, मृदुंगवर दोनखेड्याचे सरदार पाटील महाराज यांनी साथ दिली. टाळकरी मेहरुणमधील श्रीराम भजनी मंडळ होते.

कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर चौक येथील कै. सुरेशमामा नाईक यांच्या घराजवळ मेहरुण भागामध्ये होत असून सप्ताह यशस्वीतेसाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

 


 

Next Post
खा.संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियान

खा.संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियान

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add