जामनेर, दि.२५ – परिवर्तन आनंदयात्री महोत्सवाचा समारोप ‘गजल रेगिस्तान से हिंदुस्थान तक’ या कार्यक्रमाने करण्यात आला. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जनसम्पर्क अधिकारी मनोहर पाटील, चित्रकार विजय जैन, विनोद पाटील, मुख्याधिकारी अविनाश भोसले, जीतू पाटील यांची उपस्थीती होती.
तीन दिवस चाललेल्या महोत्सवात परिवर्तन निर्मित सांगितीक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. जामनेरकर रसिकांनी उत्स्फुर्थ प्रतिसाद दिला असून सभागृह प्रेक्षकांनी ओसंडून वाहत होते. दिलीप पांढरपट्टे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मंगेश कुलकर्णी यांचे होते. गझल या प्रकाराचा इतिहास निवेदनात शंभू पाटील यांनी मांडतांना गझलेला पर्शिया, अरेबिया इथे सुरुवात झाली असून सुफी संतांनी गजल भारतात आणली.
भारताच्या सांस्कृतिक भूमीत गझल रुजली, बहरली, फुलली आणि भारताच्या जीवनाचा अविभाज्य अंग गजल बनली. उर्दू या भारतीय भाषेत गझल भारतीयांच्या मनामनात गेली. अमीर खुसरो यांच्या पासून सुरु झालेला हा प्रवास गालिब यांच्यामुळे सर्वांग सुंदर झाला आणि गझल हा केवळ काव्यप्रकार उरला नाही तर गझल म्हणजे भारतीय जगण्याचं दर्शन झालं आहे.
गझल हा प्रकार मराठीसाठी नवखा नसला तरी मराठी गझल अजूनही आपली वाट शोधते आहे. ८०० वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा काव्यप्रकार समजून घेण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी, त्याचे बारकावे, सौन्दरे समजूनघेण्यासाठी परिवर्तनने “गझल रेगिस्तान से हिंदुस्थान तक” या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे मांडले. शंभु पाटील यांनी निवेदन केले.
कार्यक्रमात अक्षय गजभिये यांनी ‘समजावूनी व्यथेला’, ‘चुप के चुप के’ हंगामा है, तर श्रद्धा कुलकर्णी यांनी ‘केव्हा तरी पहाटे’, ‘पत्ता पत्ता बुटा’, ‘छाप तिलक’ अशा काही गजला सादर केल्यात. हर्षदा कोल्हटकर, कांचन महाजन यांनी सहभाग घेतला. भुषण गुरव यांनी तबल्यावर साथसंगत केली. तसेच विशाल कुलकर्णी, बुद्धभूषण मोरे यांनी तालवाद्य वाजवून साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुहास चौधरी यांनी केले. गणेश राउत यांनी सूत्रसंचालन केले महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आनंदयात्री परिवाराने परिश्रम घेतले. महोत्सवाला रसिकानी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.