जळगाव, दि.27- नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जळगावातील भाजप कार्यालयावर हल्ला चढवित कोंबड्या फेकल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजपा महिला मोर्चा व आध्यात्मिक आघाडी च्या वतीने भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात होम हवन, पूजन करून शुद्धीकरण करण्यात आले.
भाजप कार्यालयाला आम्ही मंदिर मानत असून आज शुद्धीकरण केले आहे. तसेच शिवसेनेने केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली.
या शुद्धीकरण कार्यक्रमाप्रसंगी भाजपच्या महिला मोर्चा आणि अध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.