जळगाव, दि.१६ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमत्त शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ७५ फुटाचा ध्वज उभारला गेला ध्वजाला शहरातील हजारो नागरिकांनी सलामी दिली. पाऊस असून सुद्धा लोकांचा उत्साह होता. शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या २०२२-२३ च्या विकास निधीतून ध्वजाची निर्मिती करण्यात आली. या प्रसंगी नामदार गुलाबराव पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणजे जळगाव शहरातील जेष्ठ माजी २० सैनिकांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डाॅ. प्रविण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता एल.यी. साहेब, व अभियंता सूर्यवंशी माजी महापौर सीमा भोळे, महेश चौधरी, विरण खडके, राजेंद्र मराठे, गायत्री राणे, विशाल त्रिपाठी, सुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, धीरज सोनवणे, दीपक साखरे, महेश जोशी, आनंद सपकाळे, व युवा मोर्चा सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भांडारकर, व जिल्हा सैनिक आघाडीचे अध्यक्ष सी.डी. पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव पाटील, विशाल भोळे, गजानन वंजारी, चेतन तिवारी, प्रविण भालेराव, जयेश पाटील आणि सर्व सहकार्यांनी मदत केली.