जळगाव दि. १५ – गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.
महात्मा गांधी उद्यानातील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, विजय मोहरील, बी.डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड उपस्थित होते.
ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते १९४७ पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती, महात्मा गांधी आणि गांधी युगाव्दारे स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, नेताजी सुभाषचंद्र बोस सह अन्य स्वातंत्र्यविरांच्या रचनात्मक भुमिका, यासह अनेक बाबींवर तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना आपला गौरवशाली इतिहास अनुभवता येत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य अर्ध्या रात्रीच का मिळाले? असे अनेक रोचक प्रश्नाचे आकलन होते.
स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान कसे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता, संविधान या संकल्पनेविषयी प्रदर्शनात माहिती आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ.अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्याससहल..
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी ७ ते १० तर संध्याकाळी ५ ते १० दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.९४०४९५५३०० ; ०२५७२२६४८०३ यांच्याशी संपर्क करावा,असे कळविले आहे.
आय लव्ह जळगाव सेल्फी पाँईट..
महात्मा गांधी उद्यानातील सौदंर्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईट निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पाँईटचे लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.
VIDEO
https://youtu.be/yCIhLWdQpFE