• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लोण पिराचे येथे ताजिया मिरवणुक उत्साहात साजरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2022
in धार्मिक
0
लोण पिराचे येथे ताजिया मिरवणुक उत्साहात साजरी

लालसिंग पाटील | भडगाव, दि. १० – तालुक्यातील कजगाव येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे मोहरम निमीत्ताने मंगळवारी ताजिया मिरवणुक मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

हिंदु-मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे पाहायला मिळाला. हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे. हिंदु मुस्लीम बांधव नेहमी एकत्र येत येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे सारे धार्मिक कार्यक्रम बंद होते. दोन वर्षांनंतर मोहरम निमीत्त ताजिया मिरवणुक काढण्यात आली. यात लोण पिराचे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ताजिया या कार्यक्रमासाठी कजगाव, बोदर्डे, कनाशी, बोरनार, घुसर्डी व लोण पिराचे या सर्व गावात हिंदु व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पुर्ण गावात फिरून (खिचडा) अन्न धान्य व रोख स्वरूपात आलेल्या वर्गणीतून (खिचडा मधुन) दर्गाच्या प्रांगणात भाजी भाकर बनवत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. प्रसंगी लोण पिराचे पंचक्रोशीतील नागरिक सह गावातील नागरिक जे बाहेर गावी उद्योग व्यवसाय नोकरी निम्मित स्थायिक झाले आहेत ते देखील या महाप्रसाद व ताजिया मिरवणुकीत सहभागी होतात.

ताजिया ची गावातून मिरवणुक काढण्यात आली प्रसंगी मिरवणुकी नंतर दर्ग्यावर चादर चढविण्यात आली तेथुन ताजिया घुसर्डी येथे नेण्यात आले. तेथील मिरवणुकी नंतर गिरणा नदीत ताजिया चे विसर्जन करण्यात आले. दरम्यान फिरोज पिंजारी यांचे तर्फे नागरिकांना शरबत वाटप करण्यात आले. तर कजगाव येथील डॉ.सुधीर देसले यांनी भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणुन गोड भात चे आयोजन केले होते.

Next Post
तिरंगा बाईक रॅलीने अमळनेरकरांचे वेधले लक्ष

तिरंगा बाईक रॅलीने अमळनेरकरांचे वेधले लक्ष

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add