• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाचे पदग्रहण उत्साहात

अध्यक्षपदी सुधा खटोड, सचिवपदी दीप्ती अग्रवाल यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 26, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाचे पदग्रहण उत्साहात

जळगाव, दि. २६ – येथील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या दोन वर्षाच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुधा श्रीकांत खटोड तर सचिवपदी दीप्ती अग्रवाल, कोषाध्यक्ष म्हणून अल्पना शर्मा व पीआरओ म्हणून सोनल संजय गांधी यांच्या कार्यकारिणीने शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

पदग्रहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रमिला दुसाद, प्रांत सचिव कंचन सोनी, प्रांत कोषाध्यक्ष पुष्पा खंडेलवाल, प्रांत प्रमुख अंशू अग्रवाल, सुषमा झंवर हे उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष प्रतिभा अग्रवाल यांनी मागील वर्षाच्या कामाचा आढावा सांगितला तर मावळत्या सचिव सुधा खटोड यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. पुनम वर्मा, नितू सोनी, मोनिका शर्मा, पूजा अग्रवाल, नीलकमल या तरुणींनी ही वंदना सादर केली. यानंतर प्रियंका त्रिपाठी, अनुराधा दायमा, मंगला दायमा यांनी उत्कृष्ट तलवारबाजी प्रदर्शन करून दाखविले. यानंतर श्रावण महिन्याच्या सांस्कृतिक बाबींवर कार्यक्रम सादर झाला. यामध्ये महिलांसाठी श्रावण सरीवर विविध खेळ घेण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला.

यानंतर नवीन कार्यकारिणीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष सुधा खटोड यांनी, आगामी दोन वर्षात महिला सक्षमीकरणावर तसेच पर्यावरण विकासावर भर देणार असल्याचे सांगत सामाजिक विकासाच्या बांधिलकीसाठी दक्ष राहणार असल्याचे सांगितले.

नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सुधा खटोड, उपाध्यक्षपदी सुनीता दमानी, सचिव दीप्ती अग्रवाल, सहसचिव शितल कासट, कोषाध्यक्ष अल्पना शर्मा, प्रसिद्धी प्रमुख सोनल गांधी, पर्यावरण समिती सुषमा बाहेती व सुरेखा कोठारी, महिला सशक्तिकरण नीतू सोनी, पूनम वर्मा, कार्यकारणी सदस्य उषा सिखवाल, मनीषा दायमा, अर्चना शर्मा, प्रवीण मुंदडा, सीमा गांधी यांचा समावेश आहे.


 

Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त 'नाट्य संगीत रजनी'

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add