• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलीस अधिक्षकांनी मुलीचा वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा

१२० च्यावर झाडांच्या रोपांची केली लागवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2022
in जळगाव जिल्हा
0
पोलीस अधिक्षकांनी मुलीचा वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने साजरा

जळगाव, दि.१४ – जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डाॅ.प्रविण मुंढे यांनी त्यांची कन्या देवयानीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला. आपल्या शासकीय निवासस्थान परिसरात स्थानिक जैवविवधता जपणा-या देशी झाडांच्या रोपांची लागवड यात करण्यात आली.

जैन इरिगेशन सिस्टीम लि. च्या सहकार्यातुन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हरित जळगाव ही संकल्पना घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे यांनी निवास परिसरात वृक्षलागवड करून कन्या देवयानीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत वृक्षलागवडीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले.

पोलीस अधिक्षक निवास परिसरात निंब, पिंपळ, करंज, गुलमोहर, बकूळ, जास्वंद, टिकोमा, पूत्रवंती, कन्हेर अशी १२० च्यावर झाडे लावली. सरासरी तीन वर्ष वयोगटाची ही रोपे होती. वृक्षारोपणाप्रसंगी पोलिस अधिक्षक डाॅ. प्रविण मुंढे, अमृता मुंढे या दाम्पत्यासह मुलगी देवयानी, मुलगा दिग्विजय, सासरे सेवानिवृत्त आरटीओ आयुक्त लक्ष्मण खाडे, सासू मिराबाई खाडे यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी उपस्थित होते.

तसेच राखीव दल पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, सहाय्यक फौजदार राजेश वाघ, पोलीस प्रशिक्षिक राजेश वाघ, विजय शिंदे, सोपान पाटील सर्व प्रशिक्षणार्थी अंमलदार यांनी परिश्रम घेतले. वृक्षारोपणासाठी जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी, निलेश मिस्तरी यांनी सहकार्य केले.

Next Post
वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – विद्या गायकवाड, आयुक्त

वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू - विद्या गायकवाड, आयुक्त

ताज्या बातम्या

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add