• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सूचना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 5, 2022
in जळगाव जिल्हा
0
मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सूचना

जळगांव, दि. ०५ – मान्सून काळातील सर्व यंत्रणांनी आपआपसात योग्य समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थीतीत आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. सर्व विभागांनी आपल्या विभागात दक्षता घ्यावी, त्याच प्रमाणे पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग करताना नदी काठच्या गावांना वेळोवेळी सूचना कशा पोहचतील याबाबत काळजीपूर्वक कार्यवाही करावी, वैद्यकीय पथकांनी त्यांच्या सेवा घटनास्थळावर कशा पोहचतील याचा आराखडा तयार ठेवण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची तयारी याबाबत आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, मंत्रालय, मुंबईचे प्रशांत वाघमारे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची कार्य प्रणाली, आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच शासनाकडून राज्यात सर्व जिल्ह्यांनी कार्यान्वित करण्यात येत असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समन्वय स्थापन करण्यासाठी Incident Response System विकसित करण्यात आलेल्या प्रणाली बाबत उपस्थित अधिकाऱ्यांनाही सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे संचलित सेन्दाई फ्रेमवर्क आधारित कार्य प्रणाली अंतर्गत २०३० पर्यंत जळगाव जिल्ह्याच्या वातावरणातील होणारे बदल व त्याचा सर्व क्षेत्रावर होणार परिणाम याबाबत मुद्देसूद माहिती दिली. सादरीकरणात ( Emergency Operating Center) मार्फत कशा पद्धतीने जिल्हयात कार्यवाही करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आली.

बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम हे उपस्थित होते.

Next Post
विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी केली पदकांची लयलुट

विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी केली पदकांची लयलुट

ताज्या बातम्या

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव जिल्हा

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

July 14, 2025
जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी
जळगाव जिल्हा

जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन: ३७४ पेक्षा अधिक पदांसाठी भरतीची संधी

July 14, 2025
टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते
जळगाव जिल्हा

टायगर ग्रुपच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश कोळी; शहराध्यक्षपदी विजय मोहिते

July 14, 2025
मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

मेहरूणमध्ये दोन कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन; नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

July 14, 2025
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद
गुन्हे

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

July 14, 2025
ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल
जळगाव जिल्हा

ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

July 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group