गजानन पाटील | अमळनेर, दि. ३० – शहराच्या मध्यलर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक दगडी दरवाजा आज पुन्हा एकदा कोसळला. दरम्यान याठिकाणी काम करणारे दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली मात्र सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दगडी दरवाजाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काम सुरू असताना अचानक आज एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कोणतेही जीवित हानी झाली नाही. दरम्यान संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभाग मोठी घटना होण्याची वाट तर पाहत नाहीये ना? असा संतप्त सवाल अमळनेरकर नागरिक करत आहेत.
अनेक दिवसापासून रखडलेल्या काम संथगतीने व अक्षरश: थुंकी लावून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. कोट्यावधी रुपये खर्च करून एवढ्या धीम्या गतीने सुरू असलेले काम जर पूर्ण होण्याआधीच असे कोसळत असेल तर हे काम खरचं गुणवत्ता पूर्वक होत असेल का?अमळनेरची ऐतिहासिक ओळख असलेल्या दगडी दरवाजा ची साडेसाती संपणार का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.