• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा घेण्याकरीता सहकार्य

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 29, 2022
in जळगाव जिल्हा
0
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा घेण्याकरीता सहकार्य

जळगाव दि. २९ – गुलाबी रिक्षा चालवून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. कष्टकरी, गोरगरीब महिलांना ऑटो रिक्षा घेण्यासाठी लागणारी अग्रीम रक्कम देऊन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने त्यांचा जीवनमार्ग सोपा केला व त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.

पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन अग्रीम रक्कमेसाठी आर्थिक सहाय्य केले. त्याचा छोटेखानी कार्यक्रम गांधी तीर्थला पार पडला. त्यासाठी ज्योती जैन, संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे, सचिव विजय वाणी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली. १५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी विद्याधर नेमाने यांनी सौजन्य केले.

या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी देखील पैसे नाहीत ती अडचण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आली त्यानुसार त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.

Next Post
जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण

जळगांव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण

ताज्या बातम्या

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन: १४ वर्षांखालील निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 13, 2026
मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर
जळगाव जिल्हा

मोशीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या.. – उपमहापौर

July 12, 2026
जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिसांची धडक कामगिरी: २ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तगत

July 12, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ६७ वर्षीय महिलेवर तातडीने यशस्वी बायपास; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group