जळगाव, दि.२९ – भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या तर्फे पर्यावरण पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धाचा निकाल जाहीर झाला असुन त्याचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी प.न.लुंकड कन्याशाळेत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कन्याशाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकुण ३५० मुलांनी सहभाग घेतला होता, यात २० मुला-मुलींना बक्षिस, रोख स्वरूपात व प्रमाणपत्र देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील व शहरातील इ.५ वी ते ८वी व इ.९ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक पंधरवडा चित्रकला स्पर्धेत सहभागी घेतला होता. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला.
पर्यावरण संरक्षण ही आता काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला वाढदिवसाच्या दिवशी एक रोप नक्की लावावे आपल्यासाठी, जगासाठी, व पर्यावरणासाठी आपण पर्यावरण रक्षण करणं ही काळाची गरज आहे. आपण कोरोना काळात पाहिले की ऑक्सिजन किती महत्त्वाची वस्तू असते म्हणून प्रत्येकाने आज संकल्प करायचा आहे. की प्रत्येकाने एक वृक्षारोपण करून संगोपन करावे असे वक्तव्य आमदार सुरेश भोळे यांनी बोलताना केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ. सुरेश भोळे (राजुमामा), कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, पर्यावरण रक्षक समिती जिल्हा संयोजक मनोज भांडारकर, प्रभाग समिती सदस्य, जगदिश नेवे, विशाल पाटील, प्रसिध्द चित्रकार योगेश सुतार, हेमंत जोशी, अनिल सैंदाणे, वंदना तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.