• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार.. – रजनीकांत श्रॉफ, अध्यक्ष, युपीएल

फाली संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 3, 2022
in कृषी
0
फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार.. – रजनीकांत श्रॉफ, अध्यक्ष, युपीएल

जळगाव, दि. ०३ – फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारतातील भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले. ते संमेलनातील पहिल्या सत्राच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

‘फालीच्या उपक्रमामुळे शेतीकडे नव पिढी वळते आहे. शेतीतील नव संशोधन हे सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा. आपले कुटुंब आणि आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशातील शेतीची प्रगती उत्तम होईल असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या सत्राच्या समारोपात मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी, फाली जाकिट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ, उपाध्यक्ष सान्ड्रा श्रॉफ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फालीच्या संस्थापिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, गोदरेज अग्रोवेटचे यूपीएलचे आशिष डोभाल, अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी ६७ शेती व्यवसाय योजना आणि ६७ नावीन्यपूर्ण उपकरणांविषयी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या दोन्ही सादरीकरणातून जे अव्वल ठरलेल्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यवसाय योजना तसेच नाविन्यपूर्ण शेती उपकरणांमध्ये पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.

अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, ‘तुमच्या नावीण्यपूर्ण व्यवसाय योजना आणि तंत्रज्ञान सादरीकरण स्पर्धेमुळे मी खूप प्रभावीत झालो आहे. आम्ही इथे पाहिले की, फाली विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहिली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगी तांत्रिक नावीण्य असलेली उत्पादने निर्माण केली. फाली उपक्रमात तुमच्यात ज्ञानाची ज्योत जागृत करण्याची क्षमता आहे हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला अॅग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षकांनी तुम्हाला व्यवहार ज्ञान दिलेच आहे आणि तुम्ही वास्तवातील आधुनिक व शाश्वत शेतीसाठी जोखीम घेणे हे पण समजून घेतले आहे. ही भविष्यातील शेतीत काम करण्याची क्षमता ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो.’ असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या मुख्य भाषणातून व्यक्त केले. माजी फाली विदयार्थ्यांसाठी फाली उपक्रम काही कार्यक्रम विकसित करत आहे याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही कधीतरी समाजाला काही परत द्याल. तुमच्यापैकी काही जण पुढे अॅग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षक व्हाल. तुमच्यापैकी काही जण यशस्वी शेतकरी व्हाल किंवा भावी फाली विदयार्थ्यांना पाठिंबा देणारे व पुरस्कृत करणारे उद्योजक म्हणून कार्य कराल. हेच जीवनाचे वर्तुळ आहे असे मला वाटते.

यावेळी जैनफार्म फ्रेशफूडचे संचालक अथांग जैन यांनी मार्गदर्शन केले. ‘जे काम हाती घ्याल ते उत्तम गुणवत्तेचे तर करावेच परंतु त्यात आपण अव्वल कसे असू हा दृष्टीकोन नक्की ठेवावा. त्यासाठी माझ्या आजोबांचे उदाहरण तुमच्यासमोर देतो. आजोबांकडे दूरदृष्टी होती आणि त्यांच्याकडे स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि सहनशीलता होती. तुम्ही टिश्यूकल्चर विभागाला भेट दिली असेल व तिथले कामकाज बघितले असेल. श्री भवरलालजी जैन उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर देत असत आणि त्यांच्या दृष्टीने उत्पादन चांगल्या गुणवततेचे निर्माण करणे बरोबर होते.’ असे मोलाचे विचार अथांग जैन यांनी व्यक्त केले.

नावीन्यपूर्ण (इन्होवेशन) शेती उपकरणांमधील विजेते..
सॉईल मोईश्चर ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम, भारत माता विद्यालय मायनी, सातारा (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे, (द्वितीय), अग्रिकल्चर मल्टिपर्पज इम्पिमेंट, श्रीराम विद्यालय नांदगोमुख नागपूर (तृतिय), मल्टिपल बेनिफीट टूल, रावजी फते विद्यालय खराशी पुणे (चतुर्थ), फर्टिलायझर एप्लिकेटर महात्मा गांधी विद्यालय कर्जत (पाचवा) हे विजेते ठरले.

व्यवसाय (बिझनेस) योजनामधील विजेते..
केळी संदर्भातील उत्पादन, सातपुडा विद्यालय लोणखेडा, नंदुरबार (प्रथम), बायोइंजायम गोल्डन लिक्वीड, हिरकणी विद्यालय गावडेवाडी पुणे (द्वितीय), जिरेनियम ऑईल प्रॉडोक्शन कुलस्वामिनी खांदेराई विद्यालय हिवरे, पुणे (तृतीय), इंडिग्रेटेट फार्मिंग सिस्टीम्स, महात्मा गांधी विद्यालय कर्जत, अहमदनगर (चतुर्थ), बेकरी प्रोडक्ट, पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (पाचवा) हे विजेते ठरले.

Next Post
कर्तृत्व, नेतृत्व, अभ्यासूबाणाच्या जोरावर गोपीनाथराव मुंढे यांनी जनतेची मने जिंकली.. -महापौर जयश्री महाजन

कर्तृत्व, नेतृत्व, अभ्यासूबाणाच्या जोरावर गोपीनाथराव मुंढे यांनी जनतेची मने जिंकली.. -महापौर जयश्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.