जळगाव, दि.०७ – गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए व रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी ३०३० यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशन संचलित सर्व महाविद्यालयामध्ये सामाजिक बांधिलकी अंतर्गत पशुपक्षी, प्राणी यांना पाणी पिण्यासाठी परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे माजी अध्यक्ष संजय शहा, प्रेमजी भवानजी, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विजय पाटील महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधीत करताना डॉ. प्रशांत वारके यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले. तसेच राज्यात सर्वत्र उष्णतेची प्रचंड लाट आली आहे आणि यामुळे मानवासह पशु-पक्षी, प्राण्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. जसे आपल्याला पाण्याची गरज असते तशीच पशुपक्ष्यांना, प्राण्यांना सुद्धा भासते. अशा परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य आहे की या मुक्या पशुपक्ष्यांना आपण पाणी दिले पाहिजे असे सांगितले. दरम्यान परळ महाविद्यालयाच्या परिसरात ठेवताना माणसाचा हस्तक्षेप नसेल अशाच ठिकाणी ठेवावा याची काळजी घ्यावी जेणेकरून पशुपक्षी तेथे येतील असे आवाहन यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी रोटरॅक्ट मेंबर्सला व विद्यार्थ्यांना केले. परळ संजय शहा यांनी उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमास महाविद्यालयामधील एमबीए, बीबीए, बीसीए मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. आफ्रिन खान, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.अश्विनी सोनावणे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदि कर्मचारी उपस्थित होते.