• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला प्रश्‍न विचारा – उद्योजक प्रमोद अत्‍तरदे

अमेरिकेमध्ये बदलत्या काळानुसार विविध संधी याविषयावर व्याख्यान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 12, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला प्रश्‍न विचारा – उद्योजक प्रमोद अत्‍तरदे

जळगाव, दि.१२ – यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला प्रश्‍न विचारा आणि नवनविन गोष्टी आत्मसात करण्याचा हव्यास विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकेतल्या न्यूजर्सी येथील उद्योजक प्रमोद अत्‍तरदे यांनी केले. गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सोमवारी अमेरिकेमध्ये बदलत्या काळानुसार विविध संधीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्‍ते म्हणून प्रमोद अत्‍तरदे बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, किशोर ढाके, डॉ.मिलींद पाटील, नितीन इंगळे, लिलाधर चौधरी, निला चौधरी, निता वराडे, पुजा भंगाळे, प्रा.डॉ.सुनिता चौधरी, भास्कर बोरोले, शिरीष भंगाळे, डॉ.आर.बी.वाघुळदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करुन झाली.

याप्रसंगी अमेरिकेतील क्रिप्टो असेट कंपनीचे सीईओ प्रमोद अत्‍तरदे यांनी त्याच्या व्याख्यानात विविध विषयांवर प्रकाश टाकत उदाहरणासहीत मुद्देसुदपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टेक्नॉलॉजी अ‍ॅडव्हान्समेंट बद्दल सांगतांना बायोमेडिकल सायन्स, जेनेटिक सायन्स, डिजीटल इमॉर्टल तसेच मेंदूशी संबंधित संज्ञा विस्तृतपणे स्पष्ट केल्या. तसेच भारत सरकारने ब्लॉकचेन संदर्भात सुरु केलेल्या सर्टिफाईड कोर्सची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा किमान १० वर्षाचा रोडमॅप असायला हवा, संवाद कौशल्य, गुण कौशल्ये, स्वत:ची प्रोडक्टव्हिटी, वेगवेगळ्या संधी या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्राईज व व्हॅल्यूचे समीकरण सांगितले व सांगकामे न होता स्वत:च्या गरजा ओळखून काम करण्यावर भर द्या असेही आवाहन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्‍तरेही अत्‍तरदेंनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हर्षल चौधरी, प्रा.सुरभी नेमाडे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी करत विद्यार्थ्यांना परदेशातील सुवर्णसंधीचा मागोवा घेत उज्ज्वल करियरसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागाचे डॉ.ज्ञानेश्‍वर किरंगे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी अ‍ॅकेडमिक डिन प्रा.हेमंत इंगळे, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा.दिपक झांबरे, रजिस्ट्रार प्रा.ईश्‍वर जाधव यांच्यासह जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रीकल्चर, चॉप्टर, लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन, लेवा सखी घे.भरारी, मनकर्णिका महिला मंडळ, विजयेंद्र फाऊंडेशन, गोदावरी फाऊंडेशन यांचे अनमोल सहकार्य लाभले.


 

Next Post
बहिणाबाई महोत्सवाचे जळगावात दि.१८ते२४ एप्रिल दरम्यान आयोजन VIDEO

बहिणाबाई महोत्सवाचे जळगावात दि.१८ते२४ एप्रिल दरम्यान आयोजन VIDEO

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group