जळगाव, दि.२७ – भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने ‘ भारत की आजादी का अमृत महोत्सव ‘ निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा येथून प्रसिद्ध होणाऱ्या बहुवचन या हिंदी नियतकालिकाचे संपादक अशोक मिश्र,फैजाबाद यांचे कडून संपादित केलेल्या ‘भारत कथा माला’ अनुषंगाने भारतातील ‘२१ श्रेष्ठ युवा मन की कहानिया महाराष्ट्र’ या पुस्तकाचे संपादन करण्यात आले.
डायमंड बुक्स, दिल्ली यांचेमार्फत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून भारतातील २८ राज्य आणि ९ केंद्रशासित प्रदेशातील विविध भारतीय भाषांमधील प्रकाशित २१ कथाकारांच्या कथेचा हिंदी अनुवाद सदर पुस्तकांमध्ये समावेश आहे. अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित ‘२१ श्रेष्ठ युवामंच की कहानिया महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये राहुल निकम यांच्या अस्मितादर्श नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ‘स्वाक्षरी’ या कथेचा प्रा.राजेंद्र मुंढे, वर्धा यांनी केलेला हिंदीमधील अनुवाद ‘दस्तखत’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
सदर पुस्तकामध्ये राहुल निकम यांच्यासोबत महाराष्ट्रातील मराठीत लिहिणाऱ्या जयंत पवार, सदानंद देशमुख या लेखकांच्या देखील हिंदीत अनुवादित झालेल्या कथेचा समावेश आहे. राहुल निकम यांच्या ‘बिजवाई’ कथा संग्रहातील कथेंचा अनुवाद भगवान वैद्य यांचे मार्फत करण्यात आलेला असून हिंदी भाषिक नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेला आहे.