जळगाव, दि. २२ – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगर तर्फे सोमवारी नेहरू चौकात दोन दिवसीय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजिन करण्यात आले. या शिबिरासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान शिबिराचे उदघाटन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, शोभा चौधरी, सरिता कोल्हे, ज्योती शिवदे, मानसिंग सोनवणे, मनोज चौधरी, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मतीन सय्यद आदी उपस्थतीत होते.
पहिल्या दिवशी १२ ते १४ वयोगातील १०५ तर १५ पुढील वयोगातील १०२ युवकांनी लस घेतली. लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, गिरीश सपकाळे, यश सपकाळे, चेतन कापसे, यश लोढा, उमाकांत जाधव, अभिजित रंधे, विशाल वाणी, कुलभूषण पाटील, राधेशाम कोगटा, प्रशांत नाईक, सागर हिवराळे, हितेश ठाकरे, अमोल मोरे, तेजस दुसाने, यश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.