• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तनाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 22, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तनाचे आयोजन

जळगाव, दि. २२ – साडे तीन मुहूर्ता पैकी एक पुर्ण मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे गीत रामायणा वर आधारीत दृक-श्राव्य माध्यमातून नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगम असलेली एक अंकी नृत्य नाटिका शनिवारी २ एप्रिल रोजी जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात संध्याकाळी ७ ते ९ वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला डॉ.भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

प्रभू रामांचे दिव्य कथा संकीर्तन युगानुयुगे सुरूच राहिल इतके ते सामर्थ्यवान आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अश्या कै.ग.दि.माडगूळकर यांनी रचलेल्या अजरामर रचनांना कै.सुधिर फडके यांनी संगीत देऊन गीत रामायण घराघरात पोहोचविले, आणि हेच दिव्य गीत रामायण हाच या नृत्य नाटिकेचा मुळ गाभा. किर्तन परंपरेतील आदिगुरू देवर्षी नारद मुनी आणि नर्तन परंपरेचे आद्यप्रवर्तक आदिगुरू भरत मुनी या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत झाला आहे.

संत एकनाथ महाराजांचे श्री भावार्थरामायण संत तुलसीदास यांचे श्री रामचरितमानस सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे श्री रामरसायन या सर्व दिव्य ग्रंथांचे मार्गदर्शन या रचनेस लाभले आहे. पद्मभूषण गुरु डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांनी पुनरुज्जीवित केलेली भरत नृत्यम् ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली हे याचे वैशिष्ट्य आहे. गीतरामायणा याशिवाय या नृत्यनाटिकेत किर्तन आख्यानातील पदे, आर्या, दिंडी इ. तर सादर होतेच पण प्रत्येक रचने पूर्वी निरुपण सादर होते.

Next Post
शिव जयंती निमित्त युवासेने तर्फे २०७ नागरिकांचे लसीकरण

शिव जयंती निमित्त युवासेने तर्फे २०७ नागरिकांचे लसीकरण

ताज्या बातम्या

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group