• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 22, 2022
in जळगाव जिल्हा
0
कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

जळगाव, दि.२२- कृषी वीजबिल तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी खान्देशात ठिकठिकाणी आयोजित कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत महावितरणतर्फे शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीची साद घातली जात आहे. आतापर्यंत झालेल्या १८७ मेळाव्यांत प्राप्त तक्रारी निकाली काढल्याने शेतकऱ्यांनीही वीजबिल भरण्यास दिलेला प्रतिसाद कायम आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून,  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट,  वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून मिळणाऱ्या निर्लेखन सवलतीमुळे वीज बिलाच्या थकबाकीचा बोजा कमी झाला आहे. यानंतरही जी सुधारित थकबाकी उरली आहे, त्यातील ५० टक्के रकमेचा भरणा ३२ मार्च २०२२ पर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. त्यामुळे लाखो शेतकरी वीजबिल भरण्यास पुढे आले आहेत.

ऊर्जामंत्री ‍डॉ.‍नितिन राऊत यांच्या निर्देशानुसार वीजबिलासह शेतकऱ्यांच्या सर्व वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिनांक १० ते ३१ मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तात्काळ कळविण्यात येत आहे.

महावितरणच्या वतीने खान्देशात आतापर्यंत १८७ कृषी वीज ग्राहक मेळावे झाले. त्यात वीजबिलांच्या ५५९ व इतर ६ अशा ५६५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यात १२९ मेळाव्यांत ३११, नंदुरबार जिल्ह्यात ३० मेळाव्यांत १५५ तर धुळे जिल्ह्यात २८ मेळाव्यांत ९९ तक्रारी ‍ निकाली काढण्यात आल्या. जागेवरच तातडीने तक्रार निवारण झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, वीजबिल भरण्याकडे त्यांचा ओढा कायम आहे. मेळाव्यांत उत्स्फूर्तपणे शेतकरी बिल भरत आहेत.

दरम्यान, कृषी वीजबिलांच्या सुधारित थकबाकीत ५० टक्के सवलत मिळवण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही ‍अंतिम मुदत आहे. त्यामुळे सर्व कृषी ग्राहकांनी त्यापूर्वी आपले बिल भरून थकबाकीमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

Next Post
गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तनाचे आयोजन

गुढीपाडव्या निमित्त नर्तनरूपी गुणसंकीर्तनाचे आयोजन

ताज्या बातम्या

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group