• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समाजाची पालक संस्था म्हणजे परिवर्तन जळगाव.. – कवयित्री सुचिता खल्लाळ

परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमात सुचिता खल्लाळ यांचे प्रतिपादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
समाजाची पालक संस्था म्हणजे परिवर्तन जळगाव.. – कवयित्री सुचिता खल्लाळ

जळगाव, दि. २० – समूह मनाच्या जाणिवा प्रशिक्षित करणं, त्याला सुशिक्षित सुसंकृत करणं, दुखावलेल्या व हिंसक समाज मनावर फुंकर घालत समाजाच पालकत्व परिवर्तन जळगाव करत आहे. परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमात बोलतांना कवियत्री सुचिता खल्लाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुस्तक आपल्या जगाला समृद्ध करणारी गोष्ट आहे. माणूस विवेकी असावा, माणूस प्रमाणिक असावा, माणुसकीचा झरा त्यात असावा तरच वाचनाचा उपयोग झाला अस म्हणावं. आपण अधिकाअधिक स्वीकारशील व्हावं, चिंतनशील व्हावं, स्वीकारशील होणं, इतरांच्या भावना समजून घेणं, द्वेष व हिंसा या पासून लांब जाणं ह्या साठीच वाचायला हवं, किंवा वाचन केल्यावर हा बदल आपल्यात झाला तरच वाचन केल्याचा फायदा आहे.

वाचनाने विज्ञाननिष्ठ व विवेकी माणूस निर्माण होत असतो. कारण वाचनाचा संस्कार जोपासणे ही संवेदनशील माणूस असल्याची खूण आहे. पुस्तक भिशी हा परिवर्तनचा परिवर्तनशील उपक्रम असून यातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बळ प्राप्त होत आहे. जगातील विविध घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. परिवर्तनचे हे विवेकी कार्य मला यासाठी महत्त्वाचे वाटते. असे मत कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी मांडले.

शंभू पाटील यांच्या आग्रहातून सुचिता खल्लाळ यांनी ‘माझा समकाळ’ ही कविताही सादर केली. याप्रसंगी सांगली येथील विजया हिरेमठ यांनी सांगलीत राबविलेल्या उपक्रमाविषयी सांगितले. वाचन हे माझ्यासाठी आनंदाचं ठिकाण आहे. सांगलीत ‘संवादिनी पुस्तक परिवारा’च्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत.

याप्रसंगी चित्रकार विकास मलारा, अंजली पाटील, अश्विनी बाविस्कर यांनी त्यांच्या वाचनाविषयी सांगितले. कार्यक्रमात शेवटी नितीन सोनवणे, ज्ञानेश्र्वर शेंडे, सुमेधाजी, मुकेश जाधव, श्रीकांत पाटील यांची पुढील महिन्यातील पुस्तक भिशीतील भाग्यवान वाचक म्हणून निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर शेंडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर तांत्रिक बाजू मनोज पाटील यांनी सांभाळली.

Next Post
कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

ताज्या बातम्या

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ
जळगाव जिल्हा

जळगाव सी.ए. शाखेतर्फे वाचन कक्षांचे उद्घाटन आणि आय.सी.ए.आय. भवनाच्या नूतनीकरणाचा भव्य शुभारंभ

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’
जळगाव जिल्हा

विश्व मराठी संमेलनात जळगावचा डंका; अनुभूती स्कूलच्या विद्यार्थिंनींचे बहारदार ‘कातकरी नृत्य’

March 9, 2026
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group