जळगाव, दि. ०९ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी जळगावात निदर्शने करण्यात आली. तसेच माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील षडयंत्राची सीबीआय मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.
हे सरकार दहशतवाद्यांना पाठीशी घालून अडकलेल्या मंत्रीला वाचवण्यासाठी सहकार्य करीत आहे, त्या मंत्र्याचा राजीनामा न घेता, उलट विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा प्रयत्न करीत असून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली.
आंदोलनाप्रसंगी महा विकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
VIDEO