• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वेशभूषा, एकांकिकेद्वारे महिलांच्या कर्तृत्वाचे विद्यार्थिनींनी केले कौतुक

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
वेशभूषा, एकांकिकेद्वारे महिलांच्या कर्तृत्वाचे विद्यार्थिनींनी केले कौतुक

जळगाव, दि.१० – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिननिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक योगिता धनगर, डॉ.कोमल पाटील, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक, मुख्याध्यापिका शितल कोळी आदी उपस्थित होते.

प्रस्तावनेतून संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर राजमाता जिजाऊ, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर केल्या. यात विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक, शिक्षिका, डॉक्टर, सैन्यदलातील जवान यांच्यासह राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, मदर टेरेसा, सानिया मिर्झा यांच्या वेशभूषा करून महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.

तसेच उर्वशी व उत्कर्षा सपके यांनी नृत्यासह ‘जन्म बाईचा’ हि एकांकिका सादर केली. सर्व विद्यार्थिनींचे कौतुक करीत मान्यवरांनी त्यांना सदिच्छा दिल्या. सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले. यावेळी उज्वला नंनवरे, साधना शिरसाठ, आम्रपाली शिरसाट, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

Next Post
आजी-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी  VIDEO

आजी-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी VIDEO

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add