जळगाव, दि. ०४ – युवासेना जळगाव महानगरतर्फे विधवा महिलांना शुक्रवारी जळगावात इलेक्ट्रिक मोटर युक्त शिलाई मशीनचे वाटप शहरातील शिवसेना कार्यालयात करण्यात आले.
विधवा व निराधार महिलांना रोजगार उपलब्ध होऊन मदद व्हावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे युवासेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी यांनी सांगितले.
दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या. यावेळी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेता अनंत जोशी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
VIDEO