जळगाव, दि. ०२- मेहरुण परिसरातील बरीरा युसुफ पटेल हि विद्यार्थिनी युक्रेन येथील ओझोड विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. रशिया आणि युक्रेनचे युद्ध भडकल्याने तिला भारतात परतावे लागले. अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगावला बुधवारी राजधानी एक्सप्रेसने रात्री जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले.
दरम्यान जळगाव रेल्वे स्थानकावर तिचे सर्व धर्मीयांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन बरीरा हिचे स्वागत केले. यावेळी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉक्टर राधेश्याम चौधरी प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे फारुक शेख, ताहेर शेख, जुलकर नैन, अमरुल्लाह सय्यद, शहा बिरादरीचे अनीस शाह, शेख सय्यद बिरादरीचे समीर शेख व काज़िम सय्यद, खाटीक बिरादरीचे यूसुफ ताहेर खाटीक, तसेच इक़रा महाविद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते.
बरीरा चे भारत माता की जय घोषणेसह स्वागत
बरीरा पटेल राजधानी एक्सप्रेसने रेल्वे स्थानकावर उतरताच शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी पेढा भरवीत तिचे स्वागत केले. यावेळी भारत माता की जय, वंदेमातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या.
सदका देऊन बिरदारीने मानले अल्लाह चे आभार
बरीरा ही सुखरूप परत आल्याने मनियार बिरदारीने सदका (दान) त्याच ठिकाणी उपस्थित गरीब व्यक्तिना देऊन अल्लाहचे आभार मानले. सदरचे युद्ध हे त्वरित थांबावे व निष्पाप लोक जे मृत्यूमुखी पडत आहे, त्यांच्या साठी विशेष प्रार्थना करण्यात आली.