जळगाव, दि.०२ – युक्रेन मध्ये १६००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेले ५ दिवस युद्ध सुरू आहे. आता पर्यंत फक्त २१६ विद्यार्थ्यांना भारत सरकार देशात आणू शकले असून भारताचे पंतप्रधान मात्र प्रचारात व विरोधकांना ईडी लावण्यात व्यस्त असल्याचा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केलायं.
युक्रेन मध्ये सुमारे ५५० भारतीय विद्यार्थी बेपत्ता आहे. परराष्ट्र खात कुठे आहे? असं म्हणण्याची वेळ आली असून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदीच जबाबदार आहे. त्यांची जबाबदारी असतांना ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळेच त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठे यांच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रपतींना मेल व्दारे पाठवले निवेदन..
जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ई-मेल व्दारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले आहे, की युक्रेन मधून विद्यार्थ्यांना सुखरूप रित्या भारतात आणण्यास पंतप्रधान मोदी व परराष्ट्र खात अपयशी ठरले आहे. त्यामूळे आपण भारत सरकार म्हणून जबाबदारी घ्यावी, व संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या मायभूमीत सुखरूप परत आणावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांसाठी एनएसयुआय व काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा ही देण्यात आला असल्याचे देवेंद्र मराठे यांनी सांगितले.
VIDEO
https://youtu.be/GMpki2gjg6Y