जळगाव, दि. ०१ – सध्या संपूर्ण जगात नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असून लोकांना योग्य उपचाराची नितांत गरज असल्याने रविवार शहरातील भिलपुरा येथे सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन यास्मिन बी युसूफ अली व आशा नारायण गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील हे होते. यावेळी सै.अयाज अली नियाज अली, असलम बाबा अशरफी, डॉ.परीमल मुजुमदार, हाजी दराब खान, हाजी नासिर अली, सय्यद जावेद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी साई सिंधू मल्टि स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे तज्ञ डॉ.शंतनू कुमार साहू (ऍनेस्थेटिक), डॉ.संदीप भारुडे (एम.बी.बी.एस.), डॉ.उमर देशमुख, डॉ.असरार अहेमद तसेच नर्सिंग स्टॉप यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. शिबिरात नाक, कान, घसा, ई.सी.जी., ब्लड शुगर सह इतर व्याधींची मोफत तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख शफी, शेख नजीर उद्दीन, नाजीम पेंटर, शेख सलीम उद्दीन, सुरज गुप्ता, सय्यद ओवेश अली, योगेश मराठे, शेख अर्शद, सय्यद शाहिद यांनी परिश्रम घेतले.