जळगाव, दि.२३- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेबाबत सर्वत्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.
मात्र ईडीने चौकशी केल्यावर प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यावरच त्यांना अटक केली असून त्यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांनी दिली. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. मलिक यांच्या अटकेनंतरची न्यायालयीन प्रक्रिया कशी असेल याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.
VIDEO