• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कणकवली येथे परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 21, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
कणकवली येथे परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन

जळगाव, दि.२१ – खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन संस्था ओळखली जाते. गेल्या काही वर्षंपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी आठ महोत्सव रद्द करण्यात आले होते. पण आता कणकवलीत परीवर्तन कला महोत्सव २५, २६ व २७ फेब्रुवारी २०२२ असे तीन दिवस होत आहे.

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची सुरवात बहिणाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित “अरे संसार संसार” या कार्यक्रमाने दि. २५ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे.

२६ रोजी श्रीकांत देशमुख लिखित व शंभु पाटील नाट्यरुपांतरीत योगेश पाटील दिग्दर्शित “नली” एकलनाट्य तर २७ रोजी शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित “अमृता साहिर इमरोज” हे नाटक सादर होणार आहे. तीन दिवस , एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खानदेशचा महोत्सव कोकणात पहिल्यांदा होत आहे.

आचरेकर प्रतिष्ठानने परिवर्तन जळगावचा हा सन्मान आहे. हा महोत्सव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात होणार आहे. या महोत्सवाला कांताबाई व भवरलाल जैन ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. परिवर्तनची नाटके व सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सादर होत असतात. ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे.

या महोत्सवासाठी आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शरद सावंत हे मेहनत घेत आहेत. कोकणातील हा महोत्सव परिवर्तनसाठी खूप महत्वाचा आहे. या महोत्सवाची तयारी सुरू असून अनेकांनी परिवर्तनचे अभिनंदन केले आहे.

Next Post
ब्रेन हॅमरेज झालेल्या ९० वर्षीय रुग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

ब्रेन हॅमरेज झालेल्या ९० वर्षीय रुग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add