जळगाव, दि.१२ – खडतर शैक्षणिक प्रवासाबद्दल राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका प्रिती पाटील-महाजन (ग्रंथपाल) यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव आयोजित २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित सोळळ्याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, मनपा सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, शिक्षणाधिकारी संभाजी पाटील, साहित्यीक प्रा.डॉ.शैलेंद भणगे, सिंगल वुमन फाऊंडेशन अध्यक्षा मिनाक्षी चव्हाण, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष संदिपा वाघ या मान्यवरांची उपस्थीती होती.
महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रा.प्रिती पाटील-महाजन यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यासाठी ग.स.सोसायटीच्या संचालिका कल्पना पाटील यांचे सहकार्य लाभले.
गोदावरी आईंचे आशिर्वाद..
पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.प्रिती पाटील-महाजन यांनी गोदावरीचे प्रेरणास्थान श्रीमती गोदावरी आई पाटील यांचे आशिर्वाद घेतले. तसेच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयातील नवनिर्वाचित प्राचार्य बाऊस्करसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
विविध पुरस्काराने सन्मानित..
यापूर्वीही प्रा.प्रिती महाजन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रा.प्रिती पाटील-महाजन या सेट परीक्षा उर्त्तीर्ण झाल्याबद्दल २०१९ मध्ये त्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार तर ८ मार्च २०२१ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा युवती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि यंदाच्या पुरस्काराने त्याच्या सन्मानात आणखी भर पडली आहे.
याबाबत प्रा.प्रिती पाटील-महाजन यांनी सांगितले की, माझ्या यशाचे श्रेय हे गोदावरी फाऊंडेशनला तसेच माझे आई वडिल विमल व गंगाधर पाटील (प्राथमिक शिक्षक-शिक्षीका जळगाव पिळोदे) आणि माझे पती नितीन महाजन (जळगाव पिपल्स बँंक, जळगाव जिल्हापेठ शाखा) यांना मी देते.