• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे दर गुरुवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

लॅप्रोस्कोपीद्वारेही उपचार पद्धती उपलब्ध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे दर गुरुवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

जळगाव, दि. १० – गेल्या आठ वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगावर दोन हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करणारे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची येत्या गुरुवार, १७ फेब्रुवारीपासून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सेवा सुरु होत आहे. कर्करोगाच्या रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारेही ते उपचार करतात. कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमधील त्यांचा अनुभव दांडगा असून सर्व प्रकारचे कौशल्य वापरुन ते रुग्णसेवा करतात.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात प्रत्येक आठवड्यातील दर गुरुवारी डॉ.अतुल भारंबे यांची सकाळी ९ ते १२ या वेळेत ओपीडी राहणार आहे. गेल्या आठ वर्षापासून कर्करोग तज्ञ म्हणून ते सेवा देत असून आतापावेतो २ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केल्या आहेत. कर्करोगावर उपचार आता गोदावरीतच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता राहणार नसून त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे.

तरी येत्या गुरुवारपासून सुरु होणार्‍या कर्करोग ओपीडीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या कर्करोगावर उपचार..
मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्वरपेटीचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, गर्भाशयासह अन्‍ननलिकेचा, आतड्यांचा, किडनी, मूत्रमार्ग, स्वादुपिंड तसेच पित्‍ताशयाच्या कर्करोगावर डॉ.भारंबे हे उपचार करतात.

डॉ.अतुल भारंबे यांचा परिचय..
जामनेर तालुक्यातील फत्‍तेपूर हे मुळ गाव असलेले डॉ.अतुल गजेंद्र भारंबे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील जसलोक हॉस्पीटलमधून डीएनबीची पदवी जनरल सर्जरीतून पूर्ण केली. सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर सर्जरीचे शिक्षण भरत कॅन्सर हॉस्पीटल, सुरत येथून प्राप्त केले आहे.

Next Post
घनकचरा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात VIDEO

घनकचरा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात VIDEO

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group