जामनेर, दि. ०२ – यावल तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील अल्पवयीन मुलीवर जानेवारी महिन्यात अत्याचाराची घटना घडली होती. दरम्यान अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाई करणे बाबत मंगळवारी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचेया वतीने जामनेर येथे पोलिस विभागाला निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील आदिवासी कोळी जमातीच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच ३ नराधमांनी दिनांक २६/१/२०२२ रोजी तिचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले, आणि त्याठिकाणी तिघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली. सदरच्या घटनेत सहभागी नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा होणे अपेक्षित असून त्यांच्यावर लैगिंक अत्याचार संबंधीतल्या गुन्हयातील शक्य असे कलम लाऊन गुन्हा दाखल करावा व सदरचा खटला चालविणेसाठी विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड . उज्वल निकम याची निवड करण्यात यावी. त्याचप्रमाणे पिडीत बालीकेला शासनाकडून पन्नास लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करुन तिच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. कारण पिडीतेला व तिच्या कुटूंबाच्या जिवाला धोका आहे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पिडीत बालीकेला व तिच्या कुटूंबाला योग्य तो न्याय मिळेल यादृष्टीने नराधमांना कडक शिक्षा होईल या हेतूने योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा आदिवासी वाल्मिकलव्य सेना रस्त्यावर उतरत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी एडव्होकेट भरत पवार, तालुकाध्यक्ष राधेश्याम कोळी, दिनेश वाणी, पंकज जाधव, आकाश कोळी, तुकाराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.