जळगाव, प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक एकतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. समाजातील युवा पिढीने महात्मा गांधींच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास राष्ट्रीय कोषाध्यक्ष अशोक बिसाईया, दिल्ली प्रदेशाध्यक्ष राकेश बिसाईया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहनसिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिरजू नेतले, अध्यक्ष योगेश बागडे, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, विजय अभंगे, संदीप गारुंगे,गणेश बागडे, वीर दहियेकर,राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे यांच्यासह कंजरभाट समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.









