• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

गोदावरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक शैक्षणिक भेट; स्काडा, रिफ्रिजरेशन व दुग्धप्रक्रियेची घेतली प्रत्यक्ष माहिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 2, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (तंत्रनिकेतन), जळगाव येथील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितच्या ‘विकास दूध फेडरेशन’ प्रकल्पाला औद्योगिक शैक्षणिक भेट दिली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची जोड मिळावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले.

भेटीदरम्यान विकास दूध फेडरेशनच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना दूध संकलन, शीतकरण व रिफ्रिजरेशन, पाश्चरायझेशन, प्रक्रिया आणि पॅकेजिंग या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दूध प्रक्रिया व पॅकेजिंगमधील स्वयंचलित प्रणालींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.दूध पावडर, तूप, पनीर, श्रीखंड आदी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसे केले जाते, याचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या यंत्रसामग्री, नियंत्रण प्रणाली, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि स्वयंचलित यंत्रणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी पाहिले. औद्योगिक उत्पादन प्रक्रियेत ऑटोमेशन, विद्युत नियंत्रण, रिफ्रिजरेशन आणि इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटची भूमिका विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने समजून घेतली. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उद्योगातील प्रक्रियांशी संबंध जोडण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली.

या शैक्षणिक भेटीचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, पॉलिटेक्निक समन्वयक प्रा. दीपक झांबरे आणि अकॅडमिक डीन प्रा. नितीन पाटील यांनी केले. यावेळी प्रा. वैभव झांबरे, प्रा. सचिन चिंचोले, प्रा. हर्षा पाटील, प्रा. ऋतुजा पाटील व प्रा. आकाश मुराई उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी आयोजित या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Next Post
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

ताज्या बातम्या

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जळगाव जिल्हा

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

October 2, 2026
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
खान्देश

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

October 2, 2026
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव
Uncategorized

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add