जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्ष मंडळ क्र. २ च्या वतीने शाहूनगर परिसरातील पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना खाऊ वाटप तसेच अंगणवाडी सेविकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खा. स्मिताताई वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे, जळगावच्या महापौर तथा मंडळ क्रमांक २ च्या अध्यक्षा दीपमाला काळे, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, महिला महानगराध्यक्षा नीतूताई परदेशी, मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सदस्या गायत्री राणे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जिल्हा पदाधिकारी दीपक परदेशी, सरोज पाठक, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, रेखा वर्मा, चेतना मुळीक, उषा पाठक, राजनंदिनी राणा, अंजली धवसे, सविता पोळ, सविता बोरसे, शोभा खैरे, ललित लोकचंदानी, कांचन महाजन, पायल भापकर, ऋषिकेश शिंपी, नयन सपकाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी खा. स्मिताताई वाघ यांनी अंगणवाडीतील लहान मुलांशी आपुलकीने संवाद साधला, तसेच अंगणवाडी सेविकांशी चर्चा करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिकांनी स्वागत केले.









