• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

२६ मॉडिफाईड सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 26, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

जळगाव:शहरात कर्कश आवाज काढून नागरिकांना व त्रस्त करणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध जळगाव पोलिसांनी जोरदार धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून तब्बल २६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

जळगाव पोलिसांचे आवाहन व कारवाईचा इशारा
कंपनीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून बसवलेल्या सायलेन्सरमुळे मोठे ध्वनिप्रदूषण होते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहनांमध्ये असे सायलेन्सर वापरू नयेत आणि वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडून ही तपासणी मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोउपनि अशोक काळे, पोकों रमेश अहिरे, पोकों अफजल बागवान आणि पोकों फिरोज तडवी यांनी केली.

“कर्कश आवाज नको; शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे! वाहतूक नियम पाळा, ध्वनिप्रदूषण टाळा!”

 


 

ताज्या बातम्या

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!
गुन्हे

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

August 26, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 26, 2026
वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 26, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add